Bigg Boss 20: बादशाहसोबत विभक्त झाल्यानंतर ईशा रिखीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

Bigg Boss 20 Isha Rikhi: सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू झाला आहे. या सीझनमध्ये पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. मात्र, शोमध्ये प्रवेश करण्याआधीपासूनच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

ईशा आणि रॅपर बादशाह यांनी 31 ऑगस्ट रोजी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे ईशाच्या बिग बॉसमधील एन्ट्रीकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष आहे.

शोमध्ये सहभागी होण्यामागचा उद्देश ईशाने एका मुलाखतीत स्पष्ट केला आहे. तिला केवळ कोणाची पत्नी किंवा जोडीदार म्हणून ओळख मिळवायची नाही. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे, असे तिने सांगितले.

बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील, असा विश्वास ईशाने व्यक्त केला. शोमध्ये कोणताही बनाव न करता ‘ईशा रिखी म्हणूनच’ प्रेक्षकांसमोर येणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

बादशाहसोबतच्या नात्याबद्दल आणि दोघे वेगळे का झाले, याबाबतही ईशाला प्रश्न विचारण्यात आला. दोघे सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त होते. याच वर्षी मार्चमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. त्यानंतर जूनमध्ये त्यांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक झाली.

मात्र, काही काळातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यामागे या वैयक्तिक परिस्थितीचा संबंध आहे का, असाही प्रश्न ईशाला विचारण्यात आला.

यावर ईशाने सध्या फार काही सांगणे टाळले. ‘सत्य लवकरच समोर येईल’, असे संकेत तिने दिले. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणखी काही खुलासा होणार का, याची उत्सुकता आहे.

या सीझनमध्ये ईशासोबत एमसी मेरी कोम, आम्रपाली दुबे, स्काउट म्हणजेच तन्मय सिंग, काझी तौकीर, हर्ष माचारे उर्फ युंग डीएसए, माही विज, उदिती सिंग, आसिफ खान, अमन गांधी, कुशल तन्वर उर्फ गुल्लू, अरिश्फा खान आणि कनिका मान यांच्यासह इतर स्पर्धकही सहभागी झाले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page