बाळाच्या जन्मानंतर चव्हाण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही सूरजच्या चाहत्यांकडून या गोड बातमीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सूरज आणि संजना यांच्या मुलीची पहिली झलकही समोर आली आहे. हॉस्पिटलमधील व्हिडीओमध्ये त्यांची चिमुकली दिसत आहे. संजना निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून, तिने बाळाला आपल्या हातात घेतल्याचं पाहायला मिळतं.
या खास क्षणी सूरजही पत्नी आणि मुलीकडे भावूक नजरेने पाहताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सूरज आणि संजना यांचं 2022 मध्ये लग्न झालं होतं. दोघेही आधीपासून नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं. लग्नानंतर सूरजने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले.
संजना प्रेग्नंट असतानाचे काही फोटोही सूरजने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता मुलीच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबात आणखी एका आनंदाची भर पडली आहे.
दरम्यान, सूरज गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजसाठी अलिशान बंगला बांधून दिला होता. आता बाबा होण्याचा आनंद त्याच्या आयुष्यात आला आहे.
सूरज आणि संजना यांच्या लग्नाला अद्याप 9 महिने पूर्ण झाले नसतानाच त्यांच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबासाठी जन्माष्टमीचा हा दिवस कायमचा खास ठरला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
