अजय देवगणच्या ‘धमाल ४’चा थिएटरमध्ये धुमाकूळ; 7 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई

बॉलिवूडची लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘धमाल ४’ थिएटरमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 14 कोटी रुपयांची कमाई करत शानदार सुरुवात केली. त्यानंतर वीकेंडमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्याने तीन दिवसांतच तब्बल 51 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश मिळालं.

सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा कमी झाला. मात्र, सॅकनिल्कच्या अहवालानुसार सातव्या दिवशीही चित्रपटाने 6 कोटी रुपये कमावले. त्यामुळे पहिल्या सात दिवसांत भारतातील एकूण कमाई 96 कोटी रुपये इतकी झाली आहे.

देशांतर्गत कमाईसोबतच परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरात 132 कोटी रुपये कमावत ‘धमाल ४’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

‘टोटल धमाल’नंतर आलेल्या या नव्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनोदाचा जबरदस्त डोस मिळत आहे. चित्रपटात अजय देवगण ‘गुड्डू’, तर रितेश देशमुख ‘लल्लन’च्या भूमिकेत दिसत आहे.

याशिवाय अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांची ‘आदि’ आणि ‘मानव’ ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यांच्यासोबत रवी किशन, संजय मिश्रा, अंजली आनंद, संजीदा शेख, विजय पाटकर आणि उपेंद्र लिमये यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page