Orange Juice Gang आता सिनेमात; Horror Comedy पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीत सध्या Horror Comedy चित्रपटांची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘जारण’, ‘घबाडकुंड’ आणि ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता आणखी एका नव्या मराठी हॉरर सिनेमाची चर्चा रंगू लागली आहे.

या नव्या चित्रपटाचा अनाऊन्समेंट पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, पोस्टरमधील वेगळ्या संकल्पनेमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली Orange Juice Gang या चित्रपटात झळकणार आहे.

या सिनेमात नील सालेकर (Just Neel Things), सिद्धांत सरफरे आणि करण सोनावणे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

पोस्टरमध्ये प्रत्येक पात्राच्या डोळ्यावर 500 रुपयांची नोट दाखवण्यात आली आहे. “हॉरर कॉमेडी विश्वातला गेम चेंजर येतोय” अशी ओळही पोस्टरवर पाहायला मिळते. त्यामुळे हा सिनेमा नेमका कशावर आधारित असणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या पोस्टर्समध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यातील विविध पैलू दाखवण्यात आले आहेत. कुणी कंटेंट क्रिएटर आहे, कुणी व्यवसायिक तर कुणी रोजच्या धावपळीत अडकलेला सामान्य मराठी माणूस आहे. काही पात्रं आर्थिक तणावात दिसतात, तर काही वैयक्तिक समस्यांमध्ये अडकलेली दाखवण्यात आली आहेत. मात्र सगळ्यांच्या डोळ्यावर पैशांची पट्टी असल्याने सिनेमाचा विषय पैशांभोवती फिरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र आज सिनेमाची अधिकृत घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हा चित्रपट Zee Studios Marathi प्रस्तुत करत असून, दिग्दर्शन रामचंद्र गावकर यांनी केलं आहे. तसेच दिग्दर्शक प्रितम एसके पाटील यांचा ‘घबाडकुंड’ १९ जूनला प्रदर्शित होणार आहे, तर ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page