बॉक्स ऑफिसवर राजा शिवाजी चा दबदबा; दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा वेग कायम

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी अजूनही सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या एका आठवड्यात मोठा गल्ला जमवला. सुरुवातीच्या काही दिवसांत जोरदार कमाई केल्यानंतर मधल्या काळात थोडी घसरण दिसली. मात्र आता चित्रपटाने पुन्हा वेग पकडला आहे.

व्यापार अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी भारतात 3.20 कोटी रुपये कमावले. यामध्ये मराठी आवृत्तीची कमाई सर्वाधिक असून हिंदी आवृत्तीपेक्षा मराठीत चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे चित्रपटाची देशांतर्गत एकूण कमाई 55.85 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर एकूण कलेक्शन 66 कोटींच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाने जोरदार ओपनिंग घेत 11.35 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारीही थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली. पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड दाखवून दिली.

या चित्रपटात रितेश देशमुखने केवळ मुख्य भूमिका साकारलेली नाही, तर दिग्दर्शन आणि सहलेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. कलाकारांची फौजही तितकीच दमदार आहे. जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

आता सर्वांचे लक्ष आगामी वीकेंडकडे लागले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ची ही घोडदौड आणखी वेग घेते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता चित्रपटाची कमाई पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page