झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आता एका मोठ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेतील स्वानंदी आणि समरचा शाही विवाह लवकरच पार पडणार असून, या लग्नासाठी खास समुद्रकिनारी मंडप उभारण्यात येणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून दिसली.
प्रोमोमध्ये लग्नासाठी सजवलेला समुद्रकिनारा, रात्रीसाठी म्युझिकल स्टेज आणि स्वानंदी-समरच्या वचनांचा एक भावनिक क्षण दाखवण्यात आला आहे. या सिनेमॅटिक सेटअपमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
लग्नाचे सर्व कार्यक्रमसुद्धा आता जाहीर झाले आहेत.
29 ऑक्टोबर रोजी मुहूर्ताची सुरुवात होईल. 30 आणि 31 ऑक्टोबरला मेंदीचा कार्यक्रम. 1 ते 2 नोव्हेंबर चुड्याचा समारंभ. त्यानंतर 5 आणि 6 नोव्हेंबरला हळद, 7 नोव्हेंबरला सीमंत पूजन होईल. आणि मुख्य लग्नसोहळा 8 ते 11 नोव्हेंबरदरम्यान, संध्याकाळी 7:30 वाजता पार पडणार आहे.
या लग्नाचा प्रवास अगदी सहज नव्हता. अधिरा आणि रोहनचं लग्न व्हावं म्हणून स्वानंदी आणि समरने स्वतःच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मल्लिका या लग्नाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सध्या तरी ती अपयशी ठरताना दिसत आहे.
आता या भव्य लग्नसोहळ्यात अजून कोणतं नवं वळण येईल का, की शेवटी सगळं आनंदात पार पडेल — हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘वीण दोघांतली ही तुटेना’ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
