सतिश शाह यांचं निधन; टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

Satish Shah passes away: बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतिश शाह यांचं वयाच्या ७४व्या वर्षी निधन झालं. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर दिली.

अशोक पंडित यांनी व्हिडिओ शेअर करून लिहिलं — “आमचे प्रिय मित्र आणि हरहुन्नरी अभिनेते सतिश शाह आपल्यात राहिले नाहीत. इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे. ओम शांती.” या बातमीने चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजनसृष्टी भावूक झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणी शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली.

सतिश शाह यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मधील इंद्रवर्धन साराभाई म्हणजेच इंदू ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. हा शो तेव्हा टॉप कॉमेडी शो मानला जात होता आणि त्यातील व्हिडिओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

त्यांनी कल हो ना हो, जाने भी दो यारों, मैं हूं ना, हम आपके है कौन, मस्ती, मुझसे शादी करोगी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांचा जन्म गुजरातमधील मांडवी या ठिकाणी झाला. सेंट झेवियर्स कॉलेजनंतर त्यांनी FTII मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आणि १९७० साली ‘भगवान परशुराम’ या चित्रपटातून पदार्पण केलं.

यानंतर ‘अजीब दास्तान’मुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपट आणि टीव्ही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. त्यांच्या जाण्याने भारतीय मनोरंजनविश्वाने एक बहुगुणी आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा कलाकार गमावला आहे

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page