मोठं नाव नसतानाही दिली अमर कामगिरी — सतिश शाह यांच्या प्रवासाचा आढावा

सिनेविश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सतिश शाह आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सीन छोटा असो किंवा मोठा — प्रेक्षकांना हसवण्याची आणि भावनांनी जोडून ठेवण्याची ताकद सतिश शाह यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केली.

२५ जून १९५१ रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शाळा-काॅलेजमध्ये नाटकांमधून सहभाग घेत त्यांनी लहानपणीच अभिनयाचा पाया भक्कम केला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे औपचारिक शिक्षण घेतले आणि टेलिव्हिजन तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

१९८४ साली दूरदर्शनवरील ‘ये है जिंदगी’ या मालिकेनं त्यांच्या करिअरला मोठा वळण दिलं. त्याआधी १९८३ मधील ‘जाने भी दो यारों’ या क्लासिक चित्रपटात छोटी भूमिका करूनही त्यांनी प्रेक्षकांचे पूर्ण लक्ष वेधून घेतले. पुढे ‘मैं हूं ना’, ‘फना’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांची उपस्थिती नेहमी ठसठशीत राहिली.

सतिश शाह प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी आणत असत. ‘मैं हूं ना’मधील मजेशीर प्राध्यापक असो वा ‘कल हो ना हो’मधील भावनिक पंजाबी वडील — त्यांच्या अभिनयात नैसर्गिक विनोद आणि भावनांची उष्णता दोन्ही जाणवत असे. ते केवळ हसवणारे कलाकार नव्हते; तर कथेला उंची देण्याचं कामही करत असत.

२००४ मध्ये ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या सुपरहिट मालिकेत त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवलं. रत्ना पाठक शाहसोबतची त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. अभिनयाशिवाय त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’मध्ये जज म्हणूनही लक्ष वेधलं आणि २०१५ मध्ये FTII च्या सोसायटी सदस्यपदाची जबाबदारीही सांभाळली.

वैयक्तिक आयुष्यात त्यांनी १९७२ मध्ये मधु शाह यांच्याशी विवाह केला होता आणि अनेक प्रसंगी पत्नीसमवेत सार्वजनिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहिले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page