दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’नंतर तब्बल ११ वर्षांनी आलेला हा सिक्वेल ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० लाख रुपयांच्या आसपासची कमाई केली असल्याचं समजतं.
सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या आकड्यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा उछाळ घेतला नसला तरी वीकेंडला कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महेश मांजरेकरांनी या चित्रपटाला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला चित्रपटाचं बजेट साडेसात ते आठ कोटींच्या दरम्यान ठरवलं होतं. मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भव्य सेट्समुळे ते वाढून तब्बल १३ कोटी रुपयांपर्यंत गेलं.
चित्रपटातील घोड्यांच्या दृश्यांविषयीही मांजरेकरांनी सांगितलं की, चित्रपटासाठी वापरले गेलेले दोन घोडे भाड्याने घेतले होते आणि त्यांचा खर्चच सुमारे १९ लाख रुपये झाला. तरीही निर्मात्यांच्या सहकार्यामुळे चित्रपट मोठ्या प्रमाणावर उभा राहू शकला.
पहिल्या दिवसाच्या या आकड्यांनंतर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ला वीकेंडमध्ये चांगली वाढ मिळेल, अशी अपेक्षा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हा मराठी चित्रपट सध्या सोशल मीडियावर आणि सिनेमागृहात जोरदार चर्चेत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
