आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सिरीजविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली असून सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
वानखेडेंच्या याचिकेत सिरीजमुळे त्यांची बदनामी झाली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी मालिकेत हिंसाचार, गैरवर्तन आणि सरकारी संस्थांविषयी नकारात्मक चित्रण असल्याचे सांगितले. यामुळे ड्रग्जविरोधी यंत्रणा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा खराब झाली असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी मालिकेत काही अश्लील व आक्षेपार्ह दृश्ये दाखवली गेली असून राष्ट्रीय चिन्ह आणि “सत्यमेव जयते” घोषणेचा अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले.
वानखेडेंनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटसह इतरांविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यांनी सिरीजवर कायमची बंदी घालावी आणि ₹२ कोटींची भरपाई वसूल करून ती टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला द्यावी, अशी मागणी न्यायालयासमोर केली.
सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने “खटला इथेच का दाखल केला?” असा प्रश्न विचारला. तसेच याचिकेत आवश्यक बदल करण्याची संधी देत पुढील सुनावणीची तारीख रजिस्ट्रीकडून ठरवली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
