Sachin Pilgaonkar: दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीतील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आपण वयाच्या नवव्या वर्षी पहिली कार घेतली होती आणि वरळी सीफेसवर ड्रायव्हिंग शिकलो, असा दावा त्यांनी केला. हा किस्सा त्यांच्या मुली आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिच्यासमोर सांगितल्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
सचिन एका मुलाखतीत म्हणाले, “मी 9 वर्षांचा होतो. तेव्हा सी लिंक नव्हता. आम्ही टायकलवाडीला राहायचो.” यावर श्रियाने स्मितहास्य करत “दादर” अशी दुरुस्ती केली. पुढे बोलताना सचिन म्हणाले की, “त्या वयात मी पहिली कार खरेदी केली होती. मॉरिस माइनर… छोटी पण चार दरवाजे, बकेट सीट आणि फ्लोअर गिअर असलेली कार. तिला ‘बेबी हिंदुस्थान’ म्हणत.”
मुलाखतकाराने लगेच प्रश्न केला, “मग गाडी चालवली कशी?” यावर सचिन हसत म्हणाले, “त्या काळात ड्रायव्हर होता, परवानगी नव्हती. पण वरळी सीफेसवर मी त्याच कारने गाडी चालवायला शिकलो.”
हा किस्सा ऐकताना श्रियाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू दोन्ही दिसत होतं. व्हिडिओमध्ये ती हसत म्हणताना दिसते, “काय हे बाबा!”
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या. एका युजरने लिहिलं, “आम्ही 9 वर्षांचे असताना आमच्या वडिलांनी आम्हाला सायकलही घेतली नव्हती.” आणखी एकाने मजेत लिहिलं, “महागुरू बरोबर सांगतायत, कार लहान मुलांच्या खेळण्यातील असेल.”
याआधीही पिळगावकरांनी अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. आता या नव्या दाव्यामुळे ते पुन्हा एकदा नेटिझन्सच्या चर्चेत आले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
