रोहन गुजरच्या घरी गोड बातमी, मुलगा-मुलीच्या आगमनाने पूर्ण झालं कुटुंब

‘होणार सून मी या घरची’ मालिकेत ‘पिंट्या’ ही भूमिका साकारून लोकप्रिय झालेला रोहन गुजर सध्या खास कारणामुळे चर्चेत आला आहे. रोहन आणि त्याची पत्नी स्नेहल यांच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन झालं असून त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

स्नेहलने एका गोंडस मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहन आणि स्नेहलचं कुटुंब आता पूर्ण झालं असून त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी दुहेरी आनंद आला आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

रोहनने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बाळांची पहिली झलक दाखवत त्याने “३ महिने… २ आत्मे आणि १ कुटुंब!” असं भावनिक कॅप्शन लिहिलं. यासोबतच त्याने आपल्या दोन्ही चिमुकल्यांची नावंही जाहीर केली. मुलीचं नाव ‘आद्या’ तर मुलाचं नाव ‘अद्वय’ असं ठेवण्यात आलं आहे.

रोहन आणि स्नेहल यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या तब्बल आठ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. काही महिन्यांपूर्वी स्नेहलच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले होते. तेव्हापासून चाहत्यांना या गोड बातमीची उत्सुकता लागली होती.

या आनंदामागे संघर्षाची एक बाजूही आहे. स्नेहल गुजर हिने काही काळापूर्वी गंभीर आजाराशी धैर्याने सामना केला होता. त्या कठीण काळात रोहन तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात आलेला हा आनंद अधिक खास मानला जात आहे.

रोहन आणि स्नेहल यांच्या या गोड बातमीवर मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांचं अभिनंदन करत नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रोहन गुजर याने ‘होणार सून मी या घरची’सोबतच ‘लव्ह लग्न लोचा’, ‘बन मस्का’ आणि ‘नवी जन्मेन मी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र आजही प्रेक्षक त्याला ‘पिंट्या’ या नावानेच जास्त ओळखतात. सध्या तो मालिकांबरोबरच नाटकातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page