Harman Sidhu: पंजाबी संगीतविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय गायक हरमन सिद्धू यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. वयाच्या फक्त ४०व्या वर्षी त्यांना जीव गमवावा लागला. हा अपघात मंगळवारी उशिरा रात्री मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ झाला.
माहितीनुसार, सिद्धू कारने ख्याला गावाकडे परतत होते. अचानक त्यांची कार एका ट्रकवर जोरात आदळली. धडक इतकी मोठी होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हरमन सिद्धू यांनी पंजाबी इंडस्ट्रीत कमी वेळात स्वतःचं नाव कमावलं होतं. त्यांची ‘प्यार गीता’ आणि ‘काग़ज़ या प्यार’ सारखी गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यांचा आवाज आणि म्युझिक स्टाइलमुळे त्यांनी चांगला चाहतावर्ग तयार केला होता. अचानक आलेल्या या निधनामुळे संगीतप्रेमींमध्ये हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.
सिद्धू यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. अपघाताची बातमी समजताच त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली. सर्वजण दुःखी मनाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
