या नाट्यदौऱ्याची सुरुवात पिंपरी-चिंचवड येथून झाली असून पुढे कुडाळ, रत्नागिरी, गोवा आणि चिपळूण अशा विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत. एकूण १० नाट्यप्रयोग आणि त्यासोबत लांबचा प्रवास असं दुहेरी आव्हान प्रियदर्शन पेलताना दिसणार आहे.
नाटक आणि फिरण्याची आवड या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. रात्री नाटकाचा प्रयोग आणि दुसऱ्या दिवशी प्रवास अशा पद्धतीने त्याने संपूर्ण नियोजन केलं आहे.
प्रियदर्शनच्या मते, एकट्याने बाइकने प्रवास करताना वेगवेगळी ठिकाणं आणि स्थानिक लोकांचा सहवास अनुभवता येतो. प्रवासात कुठे थांबायचं, किती वेळ थांबायचं हे स्वतः ठरवता येत असल्यामुळे अशा प्रवासात वेगळी मजा असल्याचं त्याने सांगितलं.
बाइक प्रवास आणि नाटकाचे प्रयोग एकत्र सांभाळणं ही शारीरिक आणि मानसिक कसोटी असल्याचंही त्याने मान्य केलं. मात्र योग्य नियोजन, संतुलित आहार आणि वेळेचं व्यवस्थापन यामुळे ऊर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रियदर्शनने सांगितलं.
सुरक्षिततेलाही त्याने विशेष महत्त्व दिलं आहे. प्रवासादरम्यान आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधनं तो सोबत ठेवणार आहे. तसेच अंधार किंवा धुक्यात प्रवास करताना उपयोगी पडावेत म्हणून बाइकला अतिरिक्त हेडलाइट्स देखील बसवण्यात आले आहेत.
प्रियदर्शनचा हा हटके नाट्यदौरा सध्या रंगभूमी आणि बाइक रायडिंग प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
