‘बिग बॉस 19’चा लोकप्रिय स्पर्धक आणि कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या शोच्या बाहेर आहे. मात्र त्याला बाहेर काढण्यात आलेलं नाही, तर डेंग्यूमुळे वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात आलं आहे. सलमान खाननं ‘वीकेंड का वार’ दरम्यान ही माहिती दिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
गेल्या आठवड्यात बसीर आणि नेहल घराबाहेर गेल्यानंतर, प्रणीतच्या एक्झिटनं फॅन्सना धक्का बसला. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे — प्रणीतची प्रकृती सुधारत असून तो लवकरच पुन्हा घरात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
त्याच्या टीमनं सोशल मीडियावर हेल्थ अपडेट शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला. पोस्टमध्ये लिहिलं आहे, “प्रणीतची तब्येत आता ठीक आहे. आम्ही सतत ‘बिग बॉस टीम’शी संपर्कात आहोत आणि त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळवत आहोत. तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी मनापासून आभार. कृपया त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत राहा.”
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रणीतला सध्या सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला कोणतेही विशेष अधिकार देण्यात आलेले नाहीत. शोमध्ये त्याच्या जाण्यानंतर, नव्या नॉमिनेशन कार्यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर या पाच स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.
सलमान खाननं स्पष्ट केलं की प्रणीतचं बाहेर जाणं हे केवळ वैद्यकीय कारणामुळे आहे आणि घरातील इतर सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रेक्षक आता त्याच्या लवकर पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
