शिक्षण व्यवस्थेतील वास्तव, तरुणांचा संघर्ष आणि आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सामाजिक कार्यकर्ते आणि निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी केली आहे. आमदार डॉ. संजय कुटे हे सहनिर्माते असून, दिग्दर्शनाची जबाबदारी नवीन देशबोनिया यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा अनिकेत रामचंद्र कोरडे यांनी लिहिली असून, संकलन अनिल विठ्ठल थोरात यांनी केले आहे.
प्रीमियर सोहळ्यात अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र आणि सानिका थोरसकर यांनी उपस्थित राहून चित्रपटातील भूमिका आणि चित्रीकरणाचे अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले. त्यांच्या संवादाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासह आमदार संजय कुटे, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, नारायण कुचे, किसन वानखडे, वसंत खंडेलवाल, हेमंत पाटील आणि श्वेता महाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी प्रीमियरला हजेरी लावली.
चित्रपटाच्या कथेत केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता जीवनातील वास्तव, सामाजिक मूल्ये आणि जबाबदारी यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः तरुण प्रेक्षकांशी हा चित्रपट सहज जोडला जाईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.
प्रीमियरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रदर्शनानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
