ऋषिकेश कानडे यांनी आपल्या प्रभावी अभिनयामुळे रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेषतः देशभक्तीवर आधारित ‘मी भारतीय’ या नाटकाच्या जवळपास 300 प्रयोगांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या अभिनयाला नेहमीच रसिकांकडून भरभरून दाद मिळत असे.
अभिनयासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देताना त्यांचे इतिहासप्रेम आणि राष्ट्रभक्तीही दिसून येत असे. प्रत्येक भूमिका ते पूर्ण समर्पणाने साकारत असल्याने त्यांच्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत होते.
अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत सलग दोन वर्षे अभिनयाचे रौप्यपदक मिळाले होते. रंगभूमीबरोबरच ते स्वतःचा ऑनलाइन फिटनेस क्लबही चालवत होते. त्यामुळे अभिनयासह फिटनेस क्षेत्रातही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
ऋषिकेश कानडे यांच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगकर्मी, कलाकार आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
