ज्येष्ठ अभिनेता भरत कपूर यांचे निधन; चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून श्रद्धांजली

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सायन रुग्णालयात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला होता. यासोबतच मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळेही त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती त्यांच्या जवळच्या मित्रांनी दिली.

सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. अभिनेता अवतार गिल आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

भरत कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. खलनायक आणि सहाय्यक भूमिकांमध्ये त्यांनी प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘नूरी’, ‘अखरी रास्ता’, ‘राम बलराम’ आणि ‘इंकार’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

त्यांचा दमदार आवाज, स्क्रीनवरील प्रभावी उपस्थिती आणि सहज अभिनय ही त्यांची खास ओळख होती. चित्रपटांसोबतच त्यांनी दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले. 90 च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला.

रंगभूमीवरही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे अभिनयाच्या प्रत्येक माध्यमात स्वतःचं स्थान निर्माण करणारे कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक अनुभवी कलाकार गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page