मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ती घरी रील बनवत होती. त्याच वेळी तिची तब्येत अचानक बिघडली आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिव्यांकाच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील असलेली दिव्यांका सध्या कुटुंबासोबत गाझियाबादमध्ये राहत होती. तिच्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षणाच्या बाबतीत तिने बीसीए आणि एमबीए पूर्ण केलं होतं. त्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं.
दिव्यांकाने आपल्या मेहनतीने हरियाणवी इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिने प्रसिद्ध कलाकार मासूम शर्मा यांच्यासोबतही काम केलं होतं.
सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तिचा प्रवास टिकटॉकपासून सुरू झाला आणि तिथूनच तिला ओळख मिळाली.
तिच्या अचानक निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
