प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही प्रणित मोरे घराबाहेर; काय आहे खरं कारण?

Pranit More: बिग बॉस 19’मधून एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. चर्चेत असलेला स्पर्धक प्रणित मोरे आता घराबाहेर गेला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच प्रणितने कॅप्टन्सी जिंकली होती, पण आनंदाचा हा क्षण जास्त काळ टिकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित तब्येतीच्या कारणास्तव बाहेर गेला असल्याचं बोललं जात आहे. काही सोशल मीडिया पेजवर तर त्याला डेंग्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं असून, उपचारानंतर त्याला पुन्हा खेळात आणण्याची शक्यता वर्तवली जातेय.

‘द खबरी’, ‘बिग बॉस तक’ यांसारख्या एक्स प्लॅटफॉर्म अकाउंट्सवर या वृत्ताची चर्चा जोरात आहे. काही चाहत्यांचा अंदाज आहे की, प्रणितला सीक्रेट रुममध्ये पाठवण्यात आलं आहे आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर तो परत येऊ शकतो.

गेल्या आठवड्यातच घरातून बसीर अली आणि नेहल चुडासमा बाहेर पडले होते. त्यानंतर आता प्रणितच्या एव्हिक्शनमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा धक्क्यात आहेत. त्याला प्रत्येक आठवड्यात जबरदस्त मतं मिळत असूनही हा निकाल अनपेक्षित वाटतोय.

दरम्यान, या आठवड्यात अशनूर आणि अभिषेक यांच्या चुकीमुळे कॅप्टन मृदूल वगळता सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यामुळे नेमका कोण बाहेर जाणार याबाबत तर्क-वितर्क रंगत असतानाच प्रणितच्या बाहेर जाण्याचं वृत्त आल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.

प्रणित हा या सीझनचा एक मजबूत दावेदार मानला जात होता. आता तो खरोखरच बाहेर गेला की बिग बॉसकडून आणखी एखादा ट्विस्ट आहे, हे ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्येच स्पष्ट होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page