सूरज चव्हाण आणि संजना यांचं प्रेम अखेर विवाहबंधनात; जेजुरीत होणार लग्न

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या चर्चांना जोर चढला होता आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सूरजचा विवाह मामाच्या मुलीसोबत म्हणजेच संजनाशी ठरला आहे. अंकिता वालावलकर, जी सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाते, हिनं याबाबत खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, … Read more

हॉरर-कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक चर्चेत; प्रथमेश परब आणि पॅडी कांबळे एकत्र!

Marathi Entertainment News - Rang Marathi

Hukki Movie: हॉरर आणि कॉमेडीचा संगम असलेले चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. आता असाच एक नवा मराठी चित्रपट ‘हुक्की’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. चार मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. वरुण धवन या बॉलिवूड अभिनेत्यानं स्वतः ‘हुक्की’चा फर्स्ट लुक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करून … Read more

आला रे आला! प्रणित मोरेचा बिग बॉस 19 मध्ये पुन्हा प्रवेश, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद

Marathi Entertainment News - Rang Marathi

Bigg Boss 19 मध्ये आता पुन्हा एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणास्तव घराबाहेर गेलेला मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे आता पुन्हा शोमध्ये परतला आहे. गेल्या आठवड्यातल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने जाहीर केलं होतं की, प्रणित एलिमिनेट झालेला नाही, तर आरोग्याच्या कारणास्तव त्याला घर सोडावं लागलं आहे. त्या क्षणानंतरच चाहत्यांनी सोशल मीडियावर … Read more

१२ वर्षांपूर्वीचं गुपित’! घरोघरी मातीच्या चुली मालिकेत भूतकाळाचा नवा ट्रॅक

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Gharoghari Matichya Chuli Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ लवकरच एका मोठ्या ट्वीस्टकडे वळणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत आता १२ वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक दाखवला जाणार आहे. या फ्लॅशबॅकमधून जानकी आणि ऋषिकेश यांच्या प्रेमकथेचा भूतकाळ उलगडला जाणार आहे. मराठी मालिकांमध्ये सध्या टीआरपीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक मालिका लीप, ट्वीस्ट आणि अनपेक्षित बदल आणताना … Read more

महाराष्ट्रात पहिल्यांदाच! गोंधळ चित्रपटाचा थेट सिनेमागृहातच अनुभव घ्या, दिग्दर्शकाची विनंती

Marathi Entertainment News - Rang Marathi -

मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चा होत असलेला चित्रपट म्हणजे ‘गोंधळ’. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण या प्रमोशनच्या गर्दीत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी अनपेक्षित पाउल उचललं आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर म्हटलं — “आमचा ट्रेलर बघू नका!” त्यांचं म्हणणं आहे की या चित्रपटाची खरी ताकद म्हणजे कथा हळूहळू उलगडत जाण्याची शैली. त्यामुळे … Read more

झी मराठी मालिकेत पहिल्यांदाच बीच वेडिंग — स्वानंदी-समरचं भव्य लग्न प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर

Marathi Entertainment News - Rang Marathi

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आता एका मोठ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेतील स्वानंदी आणि समरचा शाही विवाह लवकरच पार पडणार असून, या लग्नासाठी खास समुद्रकिनारी मंडप उभारण्यात येणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून दिसली. प्रोमोमध्ये लग्नासाठी सजवलेला समुद्रकिनारा, रात्रीसाठी म्युझिकल स्टेज आणि स्वानंदी-समरच्या वचनांचा एक भावनिक क्षण दाखवण्यात आला आहे. या … Read more

BB19: डबल एव्हिक्शननंतर बसीरची कबुली; प्रणितला पाहून थेट भावुक झाला

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Bigg Boss 19 च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये बसीर अली आणि नेहल चुडासमा यांना डबल एलिमिनेशनद्वारे बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला. नेहल बाहेर जाणार अशी चर्चा आधीपासून होती, पण बसीरचं एव्हिक्शन प्रेक्षकांपासून घरातील सदस्यांपर्यंत सर्वांसाठीच अनपेक्षित ठरलं. बिग बॉसमध्ये काही आठवड्यांपूर्वी झालेल्या डायनासॉर टास्कदरम्यान बसीर आणि प्रणित यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी … Read more

Bigg Boss 19: नेहल चुडासमाच्या घराबाहेर जाण्याची चर्चा; डबल एव्हिक्शनची शक्यता

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Bigg Boss 19 च्या घरात या आठवड्यात नेहल चुडासमा, बसीर अली, गौरव खन्ना आणि प्रणित मोरे नॉमिनेट झाले होते. नवव्या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ स्पेशलसाठी सलमान खान शूटिंगला लागले, आणि त्यानंतर कोणाचं एलिमिनेशन झालं, याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात सलमानने दिवाळीनिमित्ताने कोणीही घराबाहेर जाणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, या आठवड्यात कोणत्याही … Read more

जान्हवी कपूर लग्न करणार? ‘२९ ऑक्टोबर’ पोस्टनं चाहत्यांत उत्सुकता

Marathi Entertainment News - Rang Marathi

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून तिचं आणि बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांचं लग्न लवकरच होणार अशी चर्चा आहे. आता जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. जान्हवीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं — “२९ ऑक्टोबर तारीख सेव्ह करा…” आणि त्यासोबत हार्ट, डान्सिंग … Read more

‘कांतारा चॅप्टर १’चा तिसरा आठवडा निर्णायक ठरणार; मोडेल का ‘छावा’चा आकडा?

Marathi Entertainment News - Rang Marathi -

ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. मात्र, रिलीजच्या १५ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग कमी झाला आहे. पहिल्या दोन आठवड्यांत जबरदस्त कामगिरी करूनही, तिसऱ्या आठवड्याची सुरुवात थोडी मंदावलेली दिसते. २०२२ च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा हा प्रीक्वल असल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. भारतासह परदेशातही या चित्रपटाने विक्रमी कमाई … Read more

You cannot copy content of this page