देविका दफ्तरदार यांनी आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये संवेदनशील आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘सहल’मध्येही त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. ‘आई’ या भूमिकेच्या माध्यमातून त्या कोणतं भावविश्व उभं करतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटात देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर आणि सागर कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे.
सिद्धेशने यापूर्वी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये राणाच्या भावाची, सुरजची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने डॉ. केशव हेगडेवार यांची बालभूमिकाही साकारली आहे.
‘सहल’ची निर्मिती के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केलं आहे. प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर हे निर्माते असून, मुकुंद वसंत खुपेरकर सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.
चित्रपटाचं छायांकन अभिषेक शेटे यांनी केलं असून, संकलन चंद्रशेखर गुरव यांनी केलं आहे.
‘सहल’मधील गीतं सुहास मुंढे आणि समीर पठाण यांनी लिहिली आहेत. डॉ. जय भीम शिंदे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी ऐकायला मिळणार आहेत.
मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. श्रेय चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन आणि प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
देविका दफ्तरदार यांची संवेदनशील भूमिका आणि सिद्धेश खुपेरकरचं मुख्य नायक म्हणून पदार्पण यामुळे ‘सहल’ची उत्सुकता वाढली आहे. आता 9 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
