जुईच्या लग्नाबाबतचा एक Fake AI व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये जुई एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जुईने सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
जुईने संबंधित व्हिडीओची लिंक आपल्या स्टोरीवर शेअर केली आणि तो तात्काळ हटवण्याची मागणी केली. व्हिडीओ डिलीट न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही तिने दिला.
“तुम्ही जे कुणीही असाल… प्लीज आपल्या कामाकडे लक्ष द्या. लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असे फालतू व्हिडीओ बनवायला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला नीट AI पण करता येत नाहीये. अशुद्ध भाषा… सगळंच अशुद्ध!” असं जुईने म्हटलं.
तिने पुढे संबंधित चॅनेलला थेट इशारा देत लिहिलं, “हा व्हिडीओ जर आजच्या आज डिलीट झाला नाही तर लवकरच कोर्टात भेटुयात. ही विनंती आहे. प्लीज सर्वांनी हे चॅनेल रिपोर्ट करा आणि या व्हिडीओलाही रिपोर्ट करा.”
दरम्यान, जुईने संताप व्यक्त केल्यानंतर हा Fake व्हिडीओ युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या संबंधित व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध नसल्याचं दिसत आहे.
कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना सोशल मीडियावर अशा प्रकारचे दावे केले जातात. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. जुई गडकरीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आणि अभिनेत्रीने त्याविरोधात थेट भूमिका घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
