India’s Got Latent 2 मध्ये बिहार-कश्मीरवर विनोद; समय रैनावर नेत्यांची नाराजी

Samay Raina Controversy: कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. ‘India’s Got Latent 2’च्या एका एपिसोडमध्ये बिहार आणि काश्मीरशी संबंधित विनोद केल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या एपिसोडमध्ये पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेली कॉमेडियन शॅरन वर्मा पॅनेलिस्ट म्हणून उपस्थित होती. समय रैना, ओरी, अर्चना पूरण सिंह आणि निशांत सुरी यांच्यासोबत तिची विनोदी जुगलबंदी झाली. मात्र, बिहार आणि काश्मीरशी संबंधित काही टिप्पण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला.

संवादादरम्यान समयने शॅरनच्या बिहारमधील पार्श्वभूमीवर विनोद केला. त्यावर शॅरननेही समयच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील हा संवाद सुरुवातीला एकमेकांवरील roast म्हणून झाला असला, तरी त्यातील काही संदर्भांवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.

या प्रकरणावर बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, कोणत्याही नागरिक, समाज किंवा प्रदेशाचा अवमान करणारी वक्तव्ये स्वीकारली जाऊ नयेत. अशा प्रकारचे विनोद समाजातील मतभेद वाढवू शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

काँग्रेस नेते हरीश रावत यांनीही कॉमेडियनने संवेदनशील विषय हाताळताना काळजी घ्यावी, असं म्हटलं. त्यांच्या मते, विनोदातून आनंद निर्माण होणं अपेक्षित असतं; मात्र जात, समुदाय किंवा प्रदेशाची खिल्ली उडवणारा विनोद टाळायला हवा.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी या प्रकरणाला फार मोठं रूप देण्याची गरज नसल्याचं म्हटलं. चूक झाली असेल तर संबंधित व्यक्तीसोबत संवाद साधून त्याची जाणीव करून देणं अधिक योग्य ठरेल, अशी त्यांची भूमिका आहे.

भाजपचे जम्मू-काश्मीरमधील आमदार आर. एस. पठानिया यांनीही समय रैनावर टीका केली. भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यव्यवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, भाजपचे महाराष्ट्रातील आमदार राम कदम यांनीही समयच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

या वादावर जम्मू-काश्मीर पीस फोरमनेही प्रतिक्रिया देत काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासारख्या संवेदनशील विषयांचा विनोदासाठी वापर करू नये, असं म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद केवळ बिहारपुरता किंवा काश्मीरपुरता मर्यादित राहिलेला नाही.

विशेष म्हणजे, समय रैना यापूर्वीही ‘India’s Got Latent’मधील वादामुळे चर्चेत आला होता. आता दुसऱ्या सीझनच्या सुरुवातीलाच पुन्हा वाद निर्माण झाल्याने विनोदाची मर्यादा आणि कलाकारांची जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या समय रैना वादात यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page