मराठीत येतोय आणखी एक थरारक सिनेमा;‘मृत्यूचक्र’ने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीत सध्या रहस्य आणि थरारावर आधारित अनेक वेगळे विषय पाहायला मिळत आहेत. याच वाटेवर आता ‘मृत्यूचक्र’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, त्यातील गूढ वातावरणाने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मोशन पोस्टरची सुरुवात ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या टॅगलाईनने होते. पोस्टरमध्ये दिसणारं रहस्यमय घड्याळ विशेष लक्ष वेधून घेतं. आजूबाजूचा काळोख आणि भीती निर्माण करणारं वातावरण पाहता या घड्याळाचा चित्रपटाच्या कथेशी काही महत्त्वाचा संबंध असण्याची शक्यता दिसते.

मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या कथानकाबाबत फारशी माहिती समोर आणलेली नाही. त्यामुळे या घड्याळाचा मृत्यूशी काय संबंध आहे, पोस्टरमध्ये दिसणारी अदृश्य सावली नेमकी कोणाची आहे आणि मृत्यूचं हे चक्र कोणाच्या आयुष्याभोवती फिरणार आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

विशेष म्हणजे, मोशन पोस्टरमधून कथेबद्दल माहिती देण्यापेक्षा रहस्य आणखी गडद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘मृत्यूचक्र’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कथेतलं गूढ नेमकं कुठे पोहोचतं आणि मृत्यूच्या या चक्रामागचं सत्य काय आहे, यासाठी चित्रपटाच्या पुढील अपडेटकडे लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page