यंदाही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जिओहॉटस्टार आणि कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान घोड्यावरून दमदार एन्ट्री करताना दिसतो. यावेळी तो ‘करण-अर्जुन’ चित्रपटाचा संदर्भ देत, “जे तिथे घडलं, तेच आता बिग बॉसमध्येही घडणार,” असा संवाद म्हणताना दिसतो. त्यामुळे नव्या सीझनबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रोमोसोबत शेअर करण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये “एकापेक्षा दोघे बरे!” असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निर्मात्यांच्या माहितीनुसार, यंदाचा संपूर्ण सीझन एका मोठ्या रहस्याभोवती फिरणार आहे. प्रत्येक भागात या रहस्याचे नवे पैलू उलगडत जाणार असून, याआधीच्या कोणत्याही पर्वात असा ट्विस्ट पाहायला मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नव्या सीझनबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला की, प्रोमोमध्ये पहिला संकेत आधीच देण्यात आला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर प्रोमो पुन्हा पाहावा लागेल. सीझन सुरू झाल्यानंतर हे सर्व संकेत एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, हे प्रेक्षकांना समजेल.
‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार असून, हा शो जिओहॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. त्याचबरोबर तो कलर्स टीव्हीवरही प्रसारित होईल. अद्याप स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
मागील पर्वात गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आणि नव्या ट्विस्टमागचे रहस्य काय असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
