अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत नव्या व्यवसायाची घोषणा केली. “मोठी घोषणा… काहीतरी मोठं… लवकरच!” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांची उत्सुकता वाढवली. या व्हिडिओमधून तिच्या नव्या हॉटेलची झलकही पाहायला मिळाली.
माधवीच्या नव्या हॉटेलचं नाव ‘कल्याणमस्तु’ असं असून, हे हॉटेल कल्याण येथे सुरू होणार आहे. हॉटेलबाबतची अधिक माहिती आणि उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं तिने संकेत दिले आहेत.
माधवीच्या या नव्या प्रवासाचं चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी स्वागत केलं आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अभिनयाप्रमाणेच व्यवसायातही ती यशस्वी व्हावी, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
अभिनयाच्या कारकिर्दीत माधवीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील शालिनीची भूमिका विशेष गाजली आणि त्यातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
याशिवाय ‘पुढचं पाऊल’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘कुंकू’ आणि ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकांमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यासोबतच ‘पावनखिंड’, ‘संघर्ष’ आणि ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
सध्या माधवी ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत झळकत आहे. अभिनयासोबत आता हॉटेल व्यवसायातही तिने नवी सुरुवात केली असून, तिच्या ‘कल्याणमस्तु’ हॉटेलबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
