Drishyam 3: दृश्यम ३ – २१ मेला थिएटरमध्ये; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोटींची कमाई

Drishyam 3:बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहनलाल अभिनित आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित या क्राईम थ्रिलर चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात तिकीट बुकिंग केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या जगभरातील प्री-सेलने जवळपास २ कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’नंतर या फ्रँचायझीचा तिसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

नुकताच रिलीज झालेला ट्रेलरही चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जॉर्ज कुट्टी आणि त्याच्या कुटुंबाची कथा पुन्हा एकदा नव्या वळणावर जाताना दिसते. भूतकाळातील सावल्या अजूनही त्यांचा पाठलाग करत असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

मोहनलाल पुन्हा एकदा आपल्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सिद्दीक, आशा शरथ, मुरली गोपी, अंसिबा हसन आणि एस्थर अनिल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. याशिवाय वीणा नंदकुमार नव्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘दृश्यम’ मालिकेतील २ ऑक्टोबरचं रहस्य प्रेक्षकांसाठी कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. आता तिसऱ्या भागात या कथेला कोणतं नवं वळण मिळणार आणि जॉर्ज कुट्टी पुन्हा संकटातून कसा मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page