भोरमधील घटनेवर प्रवीण तरडेंची तीव्र प्रतिक्रिया; कठोर कारवाईची मागणी

पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर संतापाचं वातावरण आहे. भोर तालुक्यातील या धक्कादायक घटनेनंतर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य नागरिकांसह कलाकार मंडळीही सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत असून, आता अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपला राग व्यक्त केला. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला जलद न्याय मिळावा, अशी भावना त्यांनी पोस्टमधून मांडली. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, आरोपीविरोधात खून, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. पीडितेला न्याय मिळावा आणि दोषीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाकडूनही या प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page