राजा शिवाजी मध्ये सलमान खानने साकारली ऐतिहासिक भूमिका; डायलॉग झाला व्हायरल

सध्या अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठं स्टारकास्ट, भव्य मांडणी आणि दमदार संवाद यामुळे चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच एक चर्चा सतत रंगत होती. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान या चित्रपटात कैमिओ करणार असल्याच्या बातम्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. रितेश देशमुखनेही याबाबत संकेत दिल्यानंतर सलमान नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चर्चेवर पडदा पडला आहे. ‘राजा शिवाजी’मध्ये सलमान खानने जीवा महाला यांची भूमिका साकारल्याचं समोर आलं आहे. डोक्यावर फेटा, अंगात केशरी पोशाख आणि हातात तलवार अशा दमदार लूकमध्ये त्याची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्याचा हा अवतार चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

याहून अधिक चर्चा त्याच्या एका संवादाची होत आहे. ‘शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं…’ हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. थिएटरमध्ये हा सीन येताच प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं अनेक व्हिडिओंमधून दिसत आहे.

‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या बजेटचा चित्रपट मानला जात आहे. जवळपास 100 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे. ऐतिहासिक कथा, भव्य दृश्यं आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करेल, अशी चर्चा आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page