Renuka Shahane: अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी दिग्दर्शित केलेला ‘धावपट्टी’ हा लघुपट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांच्या या अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचं ऑस्करसाठी सिलेक्शन झाल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. खास म्हणजे, हा ऑस्करसाठी पोहोचलेला पहिलाच मराठी अॅनिमेटेड लघुपट ठरला आहे.
रेणुका शहाणे यांनी याबाबत सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘धावपट्टी’ सुरुवातीला एक साधा प्रयोग होता. कथा लिहिताना हा लघुपट अॅनिमेशनमध्येच करावा असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी स्वतःच पैसे गुंतवून हा प्रोजेक्ट बनवला. पण बनवल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचं आणि फेस्टिवलांचं इतकं प्रेम मिळेल, याची त्यांनाही अपेक्षा नव्हती.
या शॉर्ट फिल्मला विविध फेस्टिवलमध्ये छान प्रतिसाद मिळाला. बेंगळुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘धावपट्टी’ला विनर घोषित करण्यात आलं. आता या लघुपटाचं नाव ऑस्करच्या यादीत आल्यानं रेणुका शहाणे यांचाही आनंद दुपटीने वाढला आहे. त्या म्हणाल्या, “ही फिल्म ऑस्करपर्यंत पोहोचणं ही मराठीसाठी मोठी पायरी आहे. आता ती अंतिम निवडीतही यावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.”
मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलेपणाने बोललं. मुलं जन्मल्यानंतर त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्याचं सांगितलं. “तो काळ पुन्हा कधी मिळणार नाही,” असं त्या हसत म्हणाल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
