‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रचंड उत्कंठा वाढवणारे प्रसंग दाखवले जात आहेत. नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन आता सायलीच्या भूतकाळाचा शोध घेत थेट तिच्या शाळेपर्यंत पोहोचला आहे.
मधुभाऊंनी कोमात जाण्यापूर्वी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत. हीच गोष्ट त्याला सतावत आहे. सायलीने मात्र “सुभेदार मंडळीच माझं कुटुंब” असं म्हणत अर्जुनला हा शोध थांबवण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही अर्जुन या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवतो.
आश्रमात प्रत्येक मुलांची गाठोडी जपून ठेवलेली असतात. अर्जुनला सर्वांची गाठोडी मिळतात, पण सायली आणि प्रियाचं गाठोडं कुठेच सापडत नाही. याच शोधात तो प्रियाच्या खोलीत शिरतो आणि तिथे त्याला सायलीचं गाठोडं मिळतं. पण त्यात खऱ्या तन्वीचा फोटो पाहून त्याला गोंधळ होतो की हे गाठोडं प्रियाचं आहे का?
यानंतर प्रोमोमध्ये दाखवलं आहे की अर्जुन सायलीच्या शाळेत जातो. शाळेच्या फाइलमध्ये जुन्या बॅचचे रेकॉर्ड्स असून, त्यात सायली आणि प्रियाचं नावही आहे. एवढंच नाही तर फाइलमध्ये सायलीचा बालपणीचा फोटो स्पष्ट दिसतो. आता हा फोटो पाहून अर्जुनला खरं सत्य समजणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी निर्मात्यांना विनंती केली आहे की हा सायली-प्रियाचा गोंधळ आता जास्त न ताणता लवकरात लवकर खरी तन्वी कोण आहे ते दाखवावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
