Soham Bandekar Pooja Birari: अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरी लवकरच आनंदाचे क्षण येणार आहेत. त्यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा रंगली होती, आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सोहमची होणारी पत्नी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी आहे. नुकतीच तिनं इन्स्टाग्रामवर तिच्या आईवडिलांसोबत दिवाळीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला, पण सगळ्यांचं लक्ष वेधलं ते सोहमच्या कमेंटने. त्यानं पूजाच्या पोस्टवर हार्ट इमोजी टाकला, आणि पूजानेही त्याला लव्ह इमोजीनं उत्तर दिलं. त्यामुळे या जोडीने आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केल्याचं स्पष्ट झालं.
सोहम ‘ललित 205’ या मालिकेचा निर्माता असून, ‘नवे लक्ष्य’मध्ये त्याने अभिनयही केला आहे. तर पूजा सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. याआधी ती ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.
सोहम आणि पूजाचं नातं काही महिन्यांपासून चर्चेत होतं. पण आता त्यांच्या सोशल मीडिया संवादामुळे ते अधिकृत झाल्यासारखं वाटतं. काही काळापूर्वी आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये सोहमनं सांगितलं होतं, “कशीही असो, आईला आवडली पाहिजे, बस!” आणि आता ती आवडलेली मुलगी म्हणजेच पूजा बिरारी असं दिसतंय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
