Rupali Bhosale Accident: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसले एका कार अपघातामुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या मर्सिडिज बेन्झ कारचा भीषण अपघात झाला असला तरी, सुदैवाने रुपाली पूर्णपणे सुरक्षित आहे.
काही महिन्यांपूर्वीच रुपालीनं ही लग्झरी कार खरेदी केली होती. त्यावेळी तिनं गाडी घेतल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्याच गाडीचा अपघात झाल्यानं चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं.
अपघातानंतर रुपालीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला. “Accident झाला, वाईट दिवस” असं कॅप्शन देत तिनं कारचं डॅमेज झालेलं रूप दाखवलं. व्हिडीओसोबत तिनं ब्रोकन हार्टचं इमोजीही पोस्ट केलं आहे.
गाडीच्या बोनेटला मोठा डेन्ट आला असून, समोरचा भागही खराब झाला आहे. मात्र अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
सध्या रुपाली स्टार प्रवाहवरील ‘लंपडाव’ मालिकेत दिसतेय. यात ती खलनायिका सरकार या भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत चेतन वडनेरे आणि कृतिका देव मुख्य भूमिकेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
