Rupali Bhosale: लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले अलीकडेच एका अपघातातून थोडक्यात बचावली. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत साकारलेल्या संजनाच्या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत झळकतेय. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी रुपाली काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीच्या अपघाताचा फोटो शेअर करताना दिसली होती.
या अपघाताविषयी रुपालीनं नुकतीच ‘मराठी मनोरंजनविश्व’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. ती म्हणाली, “घोडबंदर रोडवर अपघात झाला. कंटेनर मागे येत होता आणि मी त्याच्या मागे होते. माझ्या मागेही एक कंटेनर होतं. पण स्वामींची कृपा म्हणून मोठं नुकसान टळलं. जर तो फोर्सने आला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती.”
रुपाली पुढे म्हणाली, “हे संकट जणू त्या गाडीने घेतलं. माझी गाडी सध्या शॉपमध्ये आहे, ती पुन्हा नवीनसारखी होईल. पण मन मात्र खूप खट्टू झालं. कारण ती माझी ड्रीम कार होती, आणि ती खराब झाल्याचं खूप वाईट वाटलं.”
स्वामींबद्दल बोलताना ती म्हणाली, “स्वामींचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. आई स्वामी भक्त आहे, ती त्यांचं पारायण करते, मुकुट बनवते. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी जणू त्यांना आधीच माहित असतात. असे अनेक अनुभव मला आले आहेत.”
रुपाली भोसलेने आतापर्यंत ‘वहिनीसाहेब’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘बडी दूर से आये है’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिच्या या प्रामाणिक आणि श्रद्धेने भरलेल्या वक्तव्याने चाहत्यांनाही भावूक केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
