Bigg Boss 19 Malti Chahar: ‘बिग बॉस १९’ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर मालती चहर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. घरात प्रवेश करताच तिच्या उपस्थितीमुळे सर्व समीकरणं बदलली आहेत. काही स्पर्धकांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर काहींमध्ये नव्या मैत्रीचं नातं जोडताना दिसत आहे.
मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची मोठी बहीण असून ती मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं ‘मॅनिक्युअर’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनयासोबतच ती दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही सक्रिय आहे.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर तिला नॉमिनेशन टास्कमध्ये खास पॉवर मिळाली, ज्यामुळे स्पर्धकांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. घरात तिनं अमाल, शहबाज आणि जिशान यांच्यासोबत मैत्री केली आहे.
मालती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या खुलाशामुळे चर्चेत आहे. एका संभाषणादरम्यान ती म्हणाली, “माझे वडील मला IPS अधिकारी बनवू इच्छित होते. माझ्या जन्मापासूनच त्यांचं ते स्वप्न होतं.”
ती पुढे म्हणाली, “लहानपणी मला घरातून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. बारावीपर्यंत माझे केस मुलांसारखेच छोटे कापलेले असायचे. मुलींसारखे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. जर मी मेहंदी लावली असती तर कानाखाली बसायचं. आम्हाला मुलींसारखं वागायलाच परवानगी नव्हती.”
या कडक शिस्तीमुळेच मालतीला आज मुलांसोबत मैत्री करणं अधिक सोपं वाटतं, असं ती म्हणाली. ती बहुतेक वेळ वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रांसोबत घालवायची.
मालतीच्या या बोलण्यावर शहबाज आणि अमाल आश्चर्यचकित झाले. तिच्या आगमनानं ‘बिग बॉस’च्या घरात नवीन घडामोडींना सुरुवात झाली आहे. तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि ठाम स्वभावामुळे घरात एक वेगळं वातावरण तयार झालं आहे.
चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे की, मालती ‘बिग बॉस’च्या या गेममध्ये पुढे कसा खेळणार आणि घरातील समीकरणं अजून कशी बदलणार.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
