Upendra Limaye: मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणारे उपेंद्र लिमये अलीकडेच एका अविस्मरणीय अनुभवाबद्दल बोलले. ते अनुभव काही आणि नाही तर सुपरस्टार रजनीकांत सरांना भेटण्याचा!
उपेंद्र म्हणतात, “मी प्रायोगिक नाटकं, समांतर चित्रपटातून घडलो. अमिताभ बच्चन, कमल हसन, मिथुन, गोविंदा यांनी त्या काळात प्रभावित केलं होतं. पण जेव्हा रजनी सरांचा करिष्मा पाहिला, तेव्हा मात्र तो प्रभाव जादुई वाटला.”
रजनीकांत यांच्या व्हॅनिटीबाहेर नेहमीच लोकांची गर्दी असते. परंतु उपेंद्र लिमयेला मात्र थेट त्यांच्या मेकअप रूममध्ये बोलावलं गेलं. हे त्यांच्यासाठी प्रचंड खास क्षण होता. दरवाजा उघडताच उपेंद्रसमोर प्रत्यक्ष रजनीकांत होते आणि तेव्हा त्यांनी मोठ्या आदराने विचारलं – “मला ठाऊक आहे, तुम्हाला मराठी येतं. मला मराठीतच बोलू द्या.” यावर रजनी सर हसून म्हणाले – “माझं ते मराठी बेळगावकडचं बरं का!”
याच संवादातून त्यांचा साधेपणा आणि प्रांजळपणा उपेंद्रना जाणवला. एवढ्या मोठ्या सुपरस्टार असूनही ते मनापासून संवाद साधतात, समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात. एवढंच नाही, तर त्यांनी उपेंद्रच्या तेलुगू चित्रपटातील कामाचं कौतुकही केलं.
उपेंद्रच्या शब्दांत, “सरांनी माझं काम पाहिलं, ही गोष्टच माझ्यासाठी अनमोल होती. त्यांच्या भेटीनं माझ्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या साधेपणात खरी जादू आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
