मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय; ‘मना’चे श्लोक’चं नाव बदलणार, नव्या तारखेला रिलीज

Manache Shlok Movie: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा नवीन मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. पण प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाभोवती वाद निर्माण झाला. हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू आघाडी यांसारख्या संघटनांनी चित्रपटाच्या नावाला विरोध करत, तो प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला होता.

काल पुण्यात दोन ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडेनं सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत मोठा निर्णय घेतला आहे.

तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “नमस्कार! ‘मना’चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून गेल्या दोन दिवसांत पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण प्रसंग पाहता आम्ही चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत. नवीन नावासह, येत्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केला जाईल.”

मृण्मयीच्या या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष सिनेमाच्या नवीन शीर्षकाकडे लागलं आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि पुढील घडामोडी कशा घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाला विरोध असला, तरी मृण्मयी देशपांडे आणि तिच्या टीमला मराठी चित्रपटसृष्टीकडून मोठा पाठींबा मिळतो आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “सेन्सॉर बोर्डची गरज काय, जर सेन्सॉर करूनही सिनेमा प्रदर्शित करता येत नसेल?”

आता मृण्मयी देशपांडेचा हा चित्रपट नव्या नावासह आणि नव्या तारखेला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page