हॉरर-कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक चर्चेत; प्रथमेश परब आणि पॅडी कांबळे एकत्र!

Hukki Movie: हॉरर आणि कॉमेडीचा संगम असलेले चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. आता असाच एक नवा मराठी चित्रपट ‘हुक्की’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. चार मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.

वरुण धवन या बॉलिवूड अभिनेत्यानं स्वतः ‘हुक्की’चा फर्स्ट लुक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करून टीमला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

नितीन रोकडे यांच्या दिग्दर्शनाखाली आणि मॅजिक स्वान स्टुडिओज व एनएमआर मुव्हीज या बॅनरखाली ‘हुक्की’ची निर्मिती झाली आहे. निर्माते नितीन रोकडे, सुनंदा काळुसकर, विनायक पाष्टे आणि श्वेता संजय ठाकरे आहेत, तर सहनिर्माते सुधीर खोत आणि रईस खान आहेत.

फर्स्ट लुकमध्ये समुद्रकिनारी कोळी बांधवांची दृश्यं, तीन तरुण आणि एक तरुणीची चौकडी आणि अचानक उघडणारा लालभडक डोळ्यांचा कावळा – या सगळ्यामुळे वातावरणात रहस्य आणि विनोदाची झलक दिसते. कथानकाची दिशा वेगळी असून प्रेक्षकांना पारंपरिक हॉररपेक्षा काहीतरी नवं पाहायला मिळेल, अशी झलक यातून मिळते.

या चित्रपटात प्रथमेश परब आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील, आरती चौबल, वर्षा धांदले, मोहक कंसारा आणि पंकज विष्णू यांच्याही भूमिका आहेत.

दिग्दर्शक रोकडे यांनी सांगितलं की, “‘हुक्की’चा फर्स्ट लुक कथानकाच्या मूडनुसार तयार केला आहे. पार्श्वसंगीत, सबटायटल्स आणि लूक यांचा उत्तम वापर करून प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात हा फर्स्ट लुक मदत करेल.”

कथालेखनात नितीन रोकडे यांच्यासोबत संदीप कुमार राय आणि मधुलिता दास यांनी सहभाग घेतला आहे. अतिरिक्त पटकथा निनाद पाठक आणि संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. संगीतकार राघवेंद्र व्ही ‘हुक्की’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांनी प्रफुल-स्वप्नील यांच्यासोबत संगीतबद्धता केली आहे. सिनेमॅटोग्राफी फारुख खान, आणि नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकरइमरान मालगुणकर यांनी केले आहे.

थरारक साहस दृश्यं संजय कुमार आणि नितीन रोकडे यांनी डिझाईन केली आहेत. त्यामुळे ‘हुक्की’मध्ये मनोरंजनासोबतच एक भन्नाट अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page