शुक्रवारी (10 जुलै) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या नियुक्तीनंतर प्रतिष्ठानच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांचे नियोजन तसेच विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
प्रशांत दामले यांच्या नावाला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिली. रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा प्रतिष्ठानच्या कामकाजाला मोठा फायदा होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मराठी रंगभूमीवर प्रशांत दामले यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आजवर 36 नाटकांमधून 13,538 हून अधिक प्रयोग सादर करत एक उल्लेखनीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्यांच्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये चार वेळा नोंद झाली आहे. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. आता नव्या जबाबदारीमुळे मुंबईतील कला आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
