Nora Fatehi Marriage: ‘दिलबर’, ‘साकी-साकी’ आणि ‘कुसू-कुसू’ या गाण्यांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नेहमीच खासगी बाबींवर मौन राखणारी नोरा आता डेटिंग आणि लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोरा सध्या एका लोकप्रिय फुटबॉल खेळाडूला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपदरम्यान तिने ‘लाइट द स्काय’ या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर तिचं फुटबॉलशी असलेलं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं.
रिपोर्ट्सनुसार, आफ्रिकन कप ऑफ नेशन्स 2025 दरम्यान नोरा मोरोक्कोमध्ये दिसली होती. याच काळात तिला दुबई आणि मोरोक्कोमध्ये एकाच व्यक्तीसोबत पाहिल्याचं बोललं जात आहे. यामुळेच तिच्या डेटिंगच्या चर्चांना अधिक बळ मिळालं.
सूत्रांच्या माहितीनुसार, नोरा आणि तिचा पार्टनर दोघेही गोपनीयता जपण्यावर भर देत आहेत. सध्या नोरा पूर्णपणे तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून खासगी आयुष्याबाबत फारसं काही उघड करत नाही. त्यामुळे या नात्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याआधीही नोरा फतेहीचं नाव काही सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, सध्याच्या चर्चा एका कोट्यवधी फुटबॉलरभोवती फिरत असल्याने त्याकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये 2026 मध्ये लग्नाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर, नोरा फतेही तिच्या डान्स परफॉर्मन्समुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष असतं.
डेटिंग आणि लग्नाच्या या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, नोरा स्वतः यावर काय बोलते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
