Nimish Kulkarni: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाईचं वातावरण आहे. नुकतंच सूरज चव्हाण, स्वानंद केतकर, अक्षता आपटे, कोमल कुंभार यांसारख्या कलाकारांचे लग्नसोहळे पार पडले. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णीही विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज आहे.
निमिषच्या घरी लग्नाआधीच्या पारंपरिक विधींना सुरुवात झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच्या मित्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये निमिषच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या दिसतात आणि तो विधी करताना दिसतो. पोस्टनुसार, येत्या ५ डिसेंबर रोजी तो लग्न करणार आहे.
निमिषची जोडीदार कोमल भास्कर आहे, जी झी मराठीची ‘EP’ म्हणून काम पाहते. दोघांचा साखरपुडा २५ जुलै २०२५ रोजी झाला होता. अनेक वर्षांच्या नात्यानंतर आता दोघे आयुष्यभराचे साथीदार होणार आहेत.
निमिषने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कामामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याचं ‘शिवाली हे खरंय’ हे स्किट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं. याशिवाय त्याने ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतही काम केलं आहे आणि सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वाचाही तो भाग आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
