ही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी दिली. या वेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि नेहरू सेंटरचे प्रशासकीय व सांस्कृतिक उपक्रमांचे मुख्य कार्यकारी नितीन करीर उपस्थित होते.
ही संपूर्ण मोहीम नाट्यपरिषद आणि नेहरू सेंटरच्या संयुक्त विद्यमान राबवली जाणार आहे. नेहरू सेंटरची वास्तू नाटकांसाठी उत्तम असूनही, येथे मराठी नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी होत असल्याची खंत गेल्या काळात व्यक्त केली जात होती.
नितीन करीर म्हणतात, सेंटरची वास्तू नाटकांसाठी अत्यंत उत्तम आहे. मात्र मराठी नाटकांचे प्रयोग अपेक्षेप्रमाणे होत नव्हते. म्हणूनच मराठी नाटकांनी या व्यासपीठाचा अधिकाधिक वापर करावा, हा त्यांचा प्रयत्न आहे.
यासाठी ‘अविष्कार‘ संस्थेसोबत टाय-अप करून विविध नाट्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. केवळ मराठी नाटकेच नाही, तर इतर भाषांतील नाटकांचे प्रयोगही येथे आयोजित केले जाणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात ‘हि दोस्ती तुटायची नाय’ या नाटकाच्या प्रयोगाने झाली. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
आता आगामी नाट्यप्रयोगांमध्ये ‘भूमिका’ आणि ‘जर तरची गोष्ट’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. याशिवाय ‘काटकोन त्रिकोण’ आणि ‘आमने-सामने’ या नाटकांचे प्रयोगही आयोजित केले जाणार आहेत.
प्रेक्षकांसाठी ‘मराठी बाणा’ या विशेष कार्यक्रमाचा आस्वादही घेता येणार आहे. या सर्व कलाकृतींचा प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे अजित भुरे यांचे आवाहन आहे.
या उपक्रमात प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांना स्थान दिले जाणार आहे. मराठी रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन मिळणार असून, नाट्यरसिकांना दर्जेदार नाट्यकृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळणार आहे.
आता नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांची नियमित वर्दळ वाढणार का, याकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे. पुढील काळातच कळणार आहे, हे नवे व्यासपीठ मराठी रंगभूमीला किती पसंती मिळवून देतंय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
