Magic Movie – Jitendra Joshi: अभिनेता जितेंद्र जोशी नववर्षात एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘मॅजिक’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 1 जानेवारीला रिलीज होत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं असून त्यावर प्रेक्षकांची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मॅजिक’ चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या अरुण राऊतची भूमिका साकारत आहे. या पात्राभोवती एक रंजक आणि गूढ कथा फिरते. नेमकं काय रहस्य उलगडणार आहे आणि अरुण राऊत कोणत्या परिस्थितीत अडकणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
हा चित्रपट तुतारी व्हेंचर्सचे राजू सत्यम यांनी निर्मित केला आहे. दिग्दर्शन रवींद्र विजया करमरकर यांनी केले असून, याआधी ‘आई कुठे काय करते’सारख्या लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. कथालेखन योगेश विनायक जोशी आणि रवींद्र करमरकर यांनी, तर पटकथा योगेश विनायक जोशी आणि अभिषेक देशमुख यांनी लिहिली आहे. छायांकन केदार फडके यांचं असून संगीत देवेंद्र भोमे आणि चिनार-महेश यांनी दिलं आहे.
चित्रपटात सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव यांसह अनेक कलाकार झळकणार आहेत. ‘मॅजिक’ अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे आणि प्रेक्षकांनीही त्याचं कौतुक केलं आहे.
थरारक कथा, दमदार स्टारकास्ट आणि प्रभावी सादरीकरणामुळे ‘मॅजिक’बद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रहस्य कधी सुटणार? याचे उत्तर 1 जानेवारीला मोठ्या पडद्यावर मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
