‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका जुळली गाठ गं मध्ये अखेर तो क्षण आलाय ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सावीने घरच्यांचा विरोध सहन करत धैर्यसोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. मुजुमदारांच्या घरात शाही पद्धतीने हा सोहळा रंगला आणि प्रोमो पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
सावी-धैर्यची कथा सुरुवातीला भांडणांनी भरलेली होती, पण आता ती प्रेम आणि विश्वासाने एकत्र आली आहे. लग्नानंतर त्यांचं आयुष्य खरंच सुखी होणार का की पुन्हा एखादा मोठा वळण घेणार? हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत आहे.
अभिनेत्री पायल मेमाणे, म्हणजेच आपली सावी, या लग्नाबद्दल सांगते की, “मालिकेत पहिल्यांदाच मी लग्नाचं शूट केलं. नवरीसारखं सजणं, मेहंदी, हिरवा चुडा घालणं, वेगवेगळे लुक्स… हे सगळं खूप मजेदार होतं. सलग दहा-बारा दिवस शूट करताना थकवा आला, पण प्रेक्षकांचं प्रेम आणि टीमची साथ पाहून उर्जा मिळाली.”
तर संकेत निकम, म्हणजेच धैर्य, म्हणतो की, “सावीच्या प्रेमामुळे धैर्य बदलला आणि प्रेक्षकांनाही तो अधिक जवळचा वाटू लागला. हळदीपासून लग्नापर्यंतच्या शूटिंगमध्ये सेटवर धमाल चालू होती. गाणी, नाच, हशा… यामुळे लग्नाचं शूट संपावंच असं वाटत नव्हतं. पण या लग्नानंतर मालिकेत अजून धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.”
जुळली गाठ गं ही मालिका रोज रात्री ८.४५ वाजता सन मराठीवर प्रसारित होते. आणि आता लग्नानंतर सावी-धैर्यच्या आयुष्यात नक्की काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
