बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ची एंट्री; हिट कि फ्लॉप?

Dhurandhar Movie Review: रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर’ चित्रपटाचा पहिला अधिकृत रिव्ह्यू समोर आला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच चर्चेत होता. भव्य ॲक्शन, मोठी स्टारकास्ट आणि देशातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित कथा यामुळे सिनेमाची उत्सुकता वाढली होती.

प्रसिद्ध समीक्षक उमैर संधू यांनी चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया शेअर केली. त्यांनी हा चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असल्याचं लिहिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तीन तासांपेक्षा जास्त लांबी असूनही एकही क्षण बोर नाही आणि कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधून ठेवते. त्यांनी ‘धुरंधर’ला ‘मस्ट वॉच’ म्हटलं आहे.

संधू म्हणतात, रणवीर सिंहने या चित्रपटात आपल्या कारकिर्दीतील सर्वात दमदार परफॉर्मन्स दिला आहे. त्याच्यासोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं आहे. संजय दत्तची उपस्थितीही कथेला वजन देते, असं त्यांनी सांगितलं.

चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि डायलॉग्स खूप प्रभावी असल्याचं समीक्षणात नमूद आहे. विशेषतः शेवटची २० मिनिटे प्रेक्षकांना थिएटर सोडताना विचार करायला लावतात.

दुसरीकडे, प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी सिनेमाला ‘जबरदस्त’ म्हणत प्रशंसा केली आहे. काहींनी अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्या भूमिकांवर खास प्रेम व्यक्त केलं. तर एका नेटकऱ्याने संजय दत्तचा अभिनय अपेक्षेनुसार नाही असं लिहिलं.

बॉक्स ऑफिसबाबत बोलायचं झाल्यास, ५००० स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ची चर्चा प्रचंड असूनही आॅडव्हान्स बुकिंगने फार वेग घेतला नाही. अहवालानुसार आतापर्यंत १४ कोटी रुपयांची आॅडव्हान्स कमाई झाली आहे. महाराष्ट्रात ३.०२ कोटी रुपये मिळाले असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘तेरे इश्क में’ या चित्रपटाने वेगाने १०० कोटी पार केल्यामुळे ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. तरीही पहिल्या दिवशी १५-२० कोटींची ओपनिंग मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page