‘लागलिया ओढ जिवा’ टीझरमध्ये चेहरे लपले! एनसीसी गणवेशातील ही जोडी कोण?

कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन येत आहे. लागलिया ओढ जिवा या नव्या मालिकेचा एआय आधारित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि या टीझरमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुख्य कलाकारांचे चेहरे अजून लपून ठेवण्यात आले आहेत.

टीझरच्या शेवटी एक तरुण जोडी एनसीसी कॅडेट्सच्या गणवेशात दिसते. मात्र ती नेमकी कोणती जोडी आहे आणि कथा कशी पुढे जाणार, हे अजून उघड झालेलं नाही. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण तयार झालं आहे.

ही फक्त प्रेमकहाणी नाही. साताऱ्याच्या रांगड्या मातीत फुलणाऱ्या या प्रेमकथेच्या मागे देशसेवेचं स्वप्न आहे. प्रेमात पडण्याआधी मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या दोन तरुणांचा प्रवास या मालिकेतून उलगडणार आहे.

टीझरमध्ये साताऱ्याच्या मातीतील खास गोडवा आणि तिथलं ग्रामीण वातावरण पाहायला मिळतं. त्यात एका तरुण जोडप्याची हळुवार फुलणारी प्रेमकहाणीही आहे. ग्रामीण भाषेतील संवाद मालिकेचा गाभा पुढे आणतात.

‘साताऱ्याची हवाच भारी, मातीत भिनलीया पिरतीची खुमारी… पण दोघांचं बी सपान एकच हुतं, आधी देशासाठी संग झटायचं अन मंग पिरमात रंगायचं!’ असं म्हणत दोघांचंही स्वप्न एकच असल्याचं या संवादातून दिसतं. आधी देशासाठी झटायचं, मग प्रेमात रंगायचं.

प्रेम, मैत्री, देशभक्ती आणि तरुणाईची स्वप्नं अशा भावनांची गुंफण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही केवळ प्रेमकहाणी न राहता देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा प्रवासही ठरू शकतो.

Colors Marathi कडून आलेल्या पोस्टमध्येही हाच मूड होता. ‘साताऱ्याच्या मातीत देशप्रेमाचं सपान पुरं व्हणार आन् प्रेम फुलणार’ असं वाहिनीने म्हटलंय. ‘लागलिया ओढ जीवा लवकरच कलर्स मराठीवर’ अशी घोषणाही त्यात केली आहे.

आता कोणत्या कलाकारांना या मालिकेतून पाहायला मिळणार, त्यांची जोडी कशी असणार आणि साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रेमकहाणी कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता वाढली आहे. ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page