अथर्व सुदामेच्या गणपती रीलवर वाद! ब्राह्मण महासंघाची कडवी टीका, शेवटी इन्फ्लुएन्सरनं मागितली माफी

Marathi Entertainment News - Rang Marathi

Atharva Sudame: सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा एक व्हिडिओ त्यानं शेअर केला, पण तोच त्याच्या डोक्यावर संकट बनून आला. व्हिडिओवरून संताप उसळला, ट्रोलिंग वाढलं आणि धमक्याही मिळाल्या. शेवटी अथर्वनं हा व्हिडिओ डिलीट करत जाहीर माफी मागितली. या प्रकरणात आता ब्राह्मण महासंघानंही उडी घेतली आहे. संस्थेचे … Read more

Bigg Boss 19: मराठमोळा रंग घरात! प्रणित मोरेची धडाकेबाज एन्ट्री, सलमान खानही बोलला मराठीत

Marathi Entertainment News - Rang Marathi

बिग बॉस 19 चा ग्रँड प्रीमियर सुरू होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या वेळी खास धक्का बसवणारा क्षण म्हणजे मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची एन्ट्री. तो घरात 11वा स्पर्धक म्हणून दाखल झाला असून आता बिग बॉसच्या हिंदी घरात मराठी आवाजही ऐकायला मिळणार आहे. स्टेजवर प्रणित येताच सलमान खानने थेट मराठीत संवाद साधून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का … Read more

“फिल्टरपाड्याचा बच्चन”ने सांगितली संघर्षकथा, सहकलाकार भावुक | Gaurav More Emotional On CHYD Stage

Marathi Entertainment News - Rang Marathi -

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर नुकताच एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. छोट्या वयात मोठं नाव कमावलेला आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गौरव मोरे, यावेळी चर्चेत आला तो त्याच्या संघर्षकथेच्या निमित्ताने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव आता CHYD मध्ये धमाल करत आहे. मात्र या आठवड्यातील भागात त्याच्यावर … Read more

‘पूर्णा आज्जी’ची आठवण कायम; ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर लेकीचं भावूक पत्र

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tharla Tar Mag Serial: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे ज्योती चांदेकर. ‘ठरलं तर मग’ मालिकेत तिने साकारलेली पूर्णा आज्जी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. दुर्दैवानं 16 ऑगस्ट रोजी 69 व्या वर्षी पुण्यात तिचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेच्या महासंगम भागाचं शूटिंग केलं होतं आणि त्यानंतर ती अचानक आपल्यातून निघून गेली. या घटनेनं … Read more

सोनाली खरेची 10 वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन; ‘नशिबवान’मध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका

Marathi Entertainment News - Rang Marathi

स्टार प्रवाहवरील ‘नशिबवान’ मालिकेतून अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर परतणार आहे. याआधी ‘बे दुणे दहा’ मालिकेत तिनं प्रभावी भूमिका केली होती, पण आता ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. सोनाली गेल्या काही वर्षांत चित्रपट, वेबसीरिज आणि स्वतःच्या निर्मिती संस्थेमुळे व्यस्त होती. मालिकांपासून दुरावली असली तरी तिच्या मनात परत एकदा छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा कायम … Read more

‘घरत गणपती’ पुन्हा थिएटरमध्ये; गणेशोत्सवात प्रेक्षकांसाठी खास भेट

Marathi Entertainment News - Rang Marathi -

काही चित्रपट असे असतात की एकदा पाहून भागत नाही. ‘घरत गणपती’ हा त्यापैकीच एक. प्रेक्षकांच्या मागणीनुसार हा लोकप्रिय मराठी चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात दुप्पट आनंद देण्यासाठी 29 ऑगस्टपासून चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “प्रेक्षक वारंवार विचारत होते की … Read more

Tango Malhar Movie: रिक्षाचालकाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर; साया दाते दिग्दर्शित चित्रपट १९ सप्टेंबरला रिलीज

Marathi Entertainment News - Rang Marathi

मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळीच गोष्ट घेऊन ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास यात मांडला आहे. या चित्रपटातून संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजिका म्हणून नाव कमावलेल्या साया दाते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा त्यांच्याकडेच असून नुकतंच या … Read more

Julali Gaath Ga: अखेर सावी-धैर्यचे लग्न! विरोध, भांडणं आणि शेवटी सात जन्माची गाठ जुळली

Marathi Entertainment News - Rang Marathi -

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका जुळली गाठ गं मध्ये अखेर तो क्षण आलाय ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सावीने घरच्यांचा विरोध सहन करत धैर्यसोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. मुजुमदारांच्या घरात शाही पद्धतीने हा सोहळा रंगला आणि प्रोमो पाहताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. सावी-धैर्यची कथा सुरुवातीला भांडणांनी भरलेली होती, पण आता ती प्रेम आणि … Read more

दहीहंडीच्या दिवशी रक्तरंजित हादरा! ‘ठरलं तर मग’ मध्ये मधुभाऊंचा खून, सायलीच्या आयुष्याला कलाटणी

Marathi Entertainment News - Rang Marathi -

Tharla Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’च्या 15 ऑगस्ट 2025 च्या भागात प्रेक्षकांना जबर धक्का बसला. सुरुवात होते सायलीने पूर्णा आजीच्या हातातून दूध दूर फेकण्यापासून. घरातील लोकांना तिचं वागणं समजत नाही, पण अर्जुन सांगतो की त्या दुधात विष होतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन सर्वांसमोर खोट्या कुमूदचा कारनामा उघड करतात. तिने दूधात विष टाकून सर्वांचा जीव … Read more

महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृहात रोज किमान एक मराठी चित्रपट दाखवावा – भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Marathi Entertainment News - Rang Marathi

Marathi Movie: महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये दररोज किमान एक मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा नियम लागू करावा, अशी मागणी भाजप आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार यांना पत्राद्वारे केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे पवार यांनी सांगितलं की, हा प्रस्ताव इतर भाषांवर भेदभाव करण्यासाठी नाही. मात्र, प्राईम टाइममध्ये … Read more

You cannot copy content of this page