‘अरण्य’मध्ये राणादाचा दमदार कमबॅक, मोशन पोस्टरमधून उलगडला गूढ जंगलाचा थरार

Aranya Movie: अरण्य या सिनेमाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यातून गूढ जंगलाचं थरारक वातावरण प्रेक्षकांसमोर आलं आहे. एस एस स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केलं असून, निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत. चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मोशन पोस्टरमध्ये दिसणारी दाट हिरवाई, धुक्याने वेढलेली दृश्यं आणि गूढ वातावरण अंगावर शहारे आणतं. त्यात हार्दिक जोशीचा कपड्याने चेहरा झाकलेला, डोळ्यांत राग आणि निर्धार असलेला लूक विशेष लक्ष वेधतो. पार्श्वभूमीत जंगलाचा रहस्यमय नाद आणि त्याच्या नजरेतून जाणवणारा संघर्ष पोस्टर अधिक प्रभावी करतो.

दिग्दर्शक अमोल करंबे यांच्या मते, अरण्य ही फक्त जंगलाची गोष्ट नाही, तर निसर्गाशी असलेलं नातं, मानवी अस्तित्व आणि संघर्षाची कहाणी आहे. या जंगलातील प्रत्येक सावलीत एक कथा दडलेली आहे — कधी शांत, तर कधी रक्तरंजित. त्यांना प्रेक्षकांनी या जंगलाचा गंध, ओलसरपणा आणि त्यातील रहस्य अनुभवावं अशी अपेक्षा आहे.

निर्माते शरद पाटील सांगतात की, अरण्य करताना तंत्रज्ञान, थरार आणि भावना यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट निसर्गाशी असलेल्या नात्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे. प्रत्येक फ्रेम आणि संवादातून एक सत्य सांगितलं आहे, जे दडलेलं असलं तरी महत्त्वाचं आहे. त्यांना खात्री आहे की हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसा उमटवेल.

हार्दिक जोशी बराच काळानंतर सिनेमाच्या माध्यमातून परतत आहे. त्याला शेवटचं जाऊ बाई गावात या शोचं सूत्रसंचालन करताना पाहिलं गेलं होतं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page