4 डिसेंबरला ‘ईठा’ येतोय, पण आधीच सिनेमाने रचलाय मोठा विक्रम!

Eetha Movie Shraddha Kapoor: सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच विक्रम रचला, हे ऐकून खरंच थक्क व्हाल. श्रद्धा कपूरच्या ईठा सिनेमाने असंच काहीतरी केलंय. सिनेमा अजून मोठ्या पडद्यावर आलेला नाही, पण त्यानेच दोन मोठ्या विक्रम आपल्या नावे केलेत.

‘जी जी रे जी’ हे सिनेमातलं पहिलं गाणं यात खास आहे. या गाण्यावर एका मिनिटात सादर झालेल्या दमदार लावणी सादरीकरणामुळे सिनेमाने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अशा दोन्ही याद्यांमध्ये नोंद केली.

हा विक्रम कसला रचला गेला याहीकडे लक्ष जाईल. एका मिनिटात सर्वाधिक महिला एकत्र येऊन लावणीचे हुक स्टेप्स करतील, असा हा खास प्रयत्न होता.

हा कार्यक्रम पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये भरला. पारंपरिक मराठी वेशभूषेत सजलेल्या शेकडो महिला आणि युवतींनी ‘जी जी रे जी’च्या तालावर एकत्र लावणीचे हुक स्टेप्स केले.

या सोहळ्याला स्वतः श्रद्धा कपूर हजर होती. सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माती करिश्मा शर्मा देखील उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड बुक्सच्या अधिकाऱ्यांनी मंचावरून अधिकृत घोषणा केली. त्यांनी मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कठपुतली क्रिएशन्स महाराष्ट्र यांना हा सन्मान दिला.

आशिकी 2’मधून चाहत्यांच्या भेटीस आलेली श्रद्धा कपूर आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांतल्या दमदार भूमिकांमधून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.

या प्रसंगी तिने पूर्ण पारंपरिक लूक केला. श्रद्धा हिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. साडीवर सोनेरी नक्षीकाम होतं आणि कॉपर-पीच रंगाचा पदर आणि रुंद काठ होता.

लूक पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरिक मराठी दागिने घातले. सिल्व्हर चोकर, झुमके, मराठी नथ, बांगड्या, कंबरपट्टा, पायात पैंजण आणि कोल्हापुरी चप्पल घालून तिने लूक पूर्ण केला.

केसांत लाल फुलांचा गजरा आणि कपाळावर टिकली लावून तिने सर्वांना घायाळ केलं.

आता 4 डिसेंबरला ‘ईठा’ मोठ्या पडद्यावर येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच विक्रम साकारल्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईठ्याचीच चर्चा रंगली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page